-डॉ. भावना पारीख
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार 2005 ते 2017 या बारा वर्षांमध्ये 84 दशलक्ष लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला आहे. त्यामुळे कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचं मुख्य कारण असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा या कर्करोगाविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. आपल्याला कर्करोग झाला आहे हे समजताच आपले हातपाय गळून जातात. मुळात आपण जागरूक असू तर कर्करोगासारख्या आजारापासून आपण आपली मुक्तता करून घेऊ शकतो.
कर्करोगाची मदत रुग्णांपर्यंत पोहोचत का नाही?
कर्करोगाचा उपचार करण्यासाठी लागणारा खर्च खूप असल्याने कित्येक दशलक्ष रुग्णांना त्या उपचाराचा लाभ मिळू शकत नाही. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झाल्यास त्याचा उपचार कमी खर्चिक असतो तसंच रुग्ण लवकर बराही होऊ शकतो. त्याचप्रमाणे कर्करोगाचं निदान उशिरा झाल्यास त्यावरील उपचार ही मोठी खर्चिक बाब असतेच, त्याचप्रमाणे त्यातून मुक्तता होण्याची शक्यतादेखील कमी असते.
डॉक्टरांच्या मते, कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक संप्रेरकांचा वापर आणि रोगप्रतिकारशक्तीचा अभाव हीदेखील असू शकतात. याशिवाय बाह्य आणि पर्यावरणविषयक कारणं, उदाहरणार्थ अन्न सवयी, औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ अशीही असू शकतात. निदान करण्यात विलंब, आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव, आपापसांत दुर्लक्ष असणे यामुळे कर्करोग हा “किलर रोग’ ठरू शकतो. खरं म्हणजे कर्करोगाचं निदान लवकर झालं तर त्यावर योग्य ते उपचार केले जातील आणि रुग्ण एक निरोगी आयुष्य जगेल. म्हणूनच कॅन्सरचे कोणते प्रकार आहेत आणि त्यांची लक्षणं काय आहेत याविषयी लोकांमध्ये माहिती प्रसारित करणं आवश्यक आहे.
मूत्रावाटे रक्त जाणे हे कर्करोगाचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. यावरून हे सिद्ध होतं की कर्करोगावर प्रतिबंध करण्यात अन्न हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. जगात सर्वाधिक बळी हे कर्करोगावर जात आहेत. मात्र, या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान करणे हे कठीण काम आहे.
रक्तातील सेरम फ्री फॅटी ऍसिड आणि मेटाबोलिटीज या घटकांच्या आधारे कर्करोगाचे निदान होऊ शकते. यासाठी नवीन बायोमार्कर तयार केले आहे. या संशोधनासाठी फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या 55 रुग्णांचे आणि प्रोस्टेट कर्करोग झालेल्या 40 रुग्णांचे नमुने गोळा केले. तसेच कर्करोग नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तींच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्याचीही तपासणी केली.
दुसऱ्या टप्प्यात फुप्फुसाची शस्त्रक्रिया ठरलेल्या 24 रुग्णांच्या रक्तांचे नमुने घेतले. कर्करोग रुग्णांमध्ये सेरम फ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढलेले दिसले. तर शस्त्रक्रिया झाल्यानंतर 24 तासात सेरम फ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण तीन ते 10 टक्क्यांपर्यंत घसरले. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान रक्ताने झाल्यास विशेष अँटिजेन टेस्ट, बायोप्सी आदींचा खर्च वाचू शकेल.
रक्ताच्या चाचणीनेही होणार कर्करोगाचे निदान
एखादी व्यक्ती आजारी पडल्यास डॉक्टर सर्वप्रथम रक्ताची चाचणी करायला सांगतात. कारण बहुतांश आजाराची माहिती ही रक्ताद्वारे कळते. मात्र, कर्करोगाचे निदान केवळ रक्ताच्या चाचण्यांद्वारे होत नव्हते. त्यासाठी इतर गुंतागुंतीच्या चाचण्या कराव्या लागत होत्या. मात्र, आता शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनानुसार फुप्फुस व प्रोस्टेट कर्करोगाचे निदान रक्ताच्या चाचण्यांनी होणार आहे. यामुळे कर्करोगाचे निदान करण्यासाठी करावा लागणारा मोठा खर्च वाचू शकेल.
कॅन्सरची रूपरेषा आणि उपचार (भाग-1)
कॅन्सरची रूपरेषा आणि उपचार (भाग-2)