-->

#Laxmii : खिलाडी कुमारपेक्षा ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने मिळवली प्रेक्षकांची वाहवा..!

मुंबई – चित्रपटरसिक ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते, तो अक्षय कुमार अभिनित ‘लक्ष्मी’ चित्रपट नुतकाच डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टर रिलीजपासूनच याची जोरदार चर्चा असून ‘कंचना 2’ या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अक्षयचा या चित्रपटातील लूक खूप वेगळा आहे. हा एक भयानक आणि कॉमेडीने परिपूर्ण असा चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजपासूनच ‘लक्ष्मी’ चित्रपटआणि अक्षय कुमार बद्दल चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.

मुख्य म्हणजे ट्रेलरमध्ये अक्षय कुमारचीच झलक जास्त प्रमाणात दिसत होती. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमारला प्रेक्षकांना संमिश्र प्रतिसाद दिला. पण, सहाय्यक भूमिकेत दिसलेल्या मराठमोळा अभिनेता ‘शरद केळकर’ने प्रेक्षांची वाहवा मिळवली आहे.

चित्रपटात शरदची एक लहानशी भूमिका आहे. असं असलं तरीही खिलाडी कुमारपेक्षाही त्याच्याच भूमिकेला चाहत्यांनी उचलून धरलं आहे. आपण साकारलेल्या भूमिकेला मिळणारं चाहत्यांचं प्रेम आणि चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून शरदनंही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचेच मनापासून आभार मानले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.