माले, (मालदीव) – मालदीवच्या संसदेमध्ये आज खासदारांची चांगलीच हाणामारी झाली. अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या सरकारला संसदेची मंजूरी देण्यासाठी मतदान प्रक्रीया सुरू असतानाच ही हाणामारी झाली.
विरोधी खासदारांनी सत्तारुढ शाकदारांना जोरदार ठोसे लगावले, काहींना खाली पाडले आणि ढकलले आणि एकमेकांची गचांडीही धरली. या खासदारांनी संसदेचा अक्षरशः कुस्तीचा आकाडा करून टाकला होता.
या संपूर्ण हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक खासदार अन्य एका कासदाराचा पाय ओढताना दिसतो आहे. तर अन्य दोघे त्याच्या अंगावर पडलेले देखील दिसते आहे.
दुसरा एक खासदार मागून एकाच्या पाठीवर गुडघा ठेवून चक्क केस ओढताना दिसतो आहे. या खासदाराला दुसरीकडे ओढण्याचा प्रयत्न अन्य काही खासदार करतानाही या व्हिडीओमध्ये बघायला मिळते आहे.