नवी दिल्ली – सियाचीनपासून ईशान्येकडील भारतीय सीमावर्ती आणि हिमालयीन प्रदेशात हिमस्खलन, पूर आणि हिमनदी संबंधित हवामान घटनांचा अचूक अंदाज लावणे आता सोपे झाले आहे. मनाली येथील डीआरडीओच्या डिफेन्स जिओ-इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट अर्थात डीजीआरई येथे आधुनिक तंत्रज्ञानाची कॅलिब्रेशन प्रयोगशाळा तयार आहे. हिमस्खलन सेन्सरसाठी अशा प्रकारची पहिली प्रयोगशाळा देशात बांधण्यात आली आहे.
नुकतेच डीआरडीओचे महासंचालक डॉ. शैलेंद्र व्ही. गाडे यांनी मनाली येथे या ग्लेशियर कॅलिब्रेशन लॅबोरेटरीचे उद्घाटन केले. यावेळी डीजीआरई मनालीचे संचालक डॉ.प्रमोदकुमार सत्यावली, प्रयोगशाळेचे संचालक डॉ.नीरज शर्मा उपस्थित होते.
हिमस्खलन आणि हवामानविषयक डेटा गोळा करण्यासाठी प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स एकत्र करेल. यामुळे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैन्याला हिमस्खलन आणि हिमनदींशी संबंधित अंदाजाची तयारी करण्याची संधी मिळेल. त्याच वेळी, पुरासारख्या घटनांचा अंदाज घेऊन, आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करता येते. आजवर अनेकदा हिमस्खलनामुळे अनेक भारतीय जवानांना जीव गमवावा लागला आहे. मात्र आता नैसर्गिक आपत्तीचा अचूक अंदाज येणार असल्याने जवानांना सावरण्याची संधी मिळणार आहे. सियाचीन ग्लेशियरच्या उत्तर-पूर्वेला भारतीय सीमा हिमालयात स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचे सेन्सर्स मनाली येथून कार्यान्वित केले जातील.
डीजीआरईचे संचालक डॉ. प्रमोद कुमार सत्यावली यांनी सांगितले की, प्रयोगशाळेतून आम्ही हिमस्खलन आणि हवामानाशी संबंधित सेन्सर नियमित अंतराने किंवा आवश्यकतेनुसार कॅलिब्रेट करून गोळा केलेल्या डेटाची अचूकता आणि गुणवत्ता राखण्यात सक्षम होऊ.