मुंबई – कोरोना व्हायरस मुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे. असे असताना चीन सरहद्दीवर कुरापती करीत आहे. त्यामुळे चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली असून केंद्र सरकारनेही 69 चिनी अॅपवर बंदी आणली आहे.
दरम्यान, आता याचा फायदा घेत ‘लावा’ सारख्या भारतीय मोबाईल कंपनीने तुमच्यासाठी खास स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत देखील खूप कमी आहे. लावाने भारतात ‘लावा झेड61 प्रो’ हा दमदार फोन लाँच केला असून, या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत 5,774 रुपये आहे.
‘लावा झेड61 प्रो’ चे दमदार फीचर्स:
‘लावा झेड61 प्रो’ या फोनमध्ये 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. तसेच यात 2 जीबी रॅम + 16 जी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे. हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 128 जीबी पर्यंत वाढवता येईल.
‘लावा झेड61 प्रो’ मध्ये 5.45 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 18:9 आहे आणि यात 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन व्यतिरिक्त पुढील काही दिवसांत ऑफलाईन स्टोर्समध्ये हा फोन तुम्हाला मिळेल.