मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.
तापसी म्हणते,‘असं होईल याचा विचारही आम्ही केला नव्हता. आणि मग सगळे म्हणतात की बॉलिवूड चित्रपटांच्या कथा या वास्तवदर्शी नसतात, जे समाजात घडत तेच आम्ही चित्रपटामध्ये दाखवितो ’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे.तापसी पन्नूने ट्विटरद्वारे विकास दुबे एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे.