जिल्ह्यात कोव्हिड -19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

नगर – केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यातर्फे कोव्हिड -19 लसीकण व आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानाला आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नगरचे प्रभारी प्रचार अधिकारी पी. फणिकुमार उपस्थित होते.

या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शेवगाव येथील जय हिंद लोक कला मंच, कुलस्वामिनी कला प्रतिष्ठान, नगर यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. 

या प्रचार मोहिमेचा मूळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे होय. आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना या जनजागृती अभियानातून दिली जाणार आहे. 

येत्या दहा दिवसांत जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, संगमनेर, अकोले, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.