इंधन दरवाढीचा निषेध; ममता बॅनर्जी यांनी केली स्कुटर सवारी

कोलकता  – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी स्कुटर सवारी केली. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी ती कृती करत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
ममतांनी त्यांचे निवासस्थान ते सचिवालय असा सात किलोमीटरचा प्रवास इलेक्‍ट्रीक स्कुटरवरून केला. ती स्कुटर एका मंत्र्याने चालवली. संबंधित मंत्री आणि ममतांनी हेल्मेट परिधान केले होते.

त्या प्रवासावेळी इंधन दरवाढीचा निषेध करणारा फलकही ममतांनी गळ्यात अडकवला. सचिवालयात पोहचल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला. ते सरकार केवळ खोटी आश्‍वासने देते. इंधन दर कमी करण्यासाठी ते सरकार कुठलीही पाऊले उचलत नाही. मोदी सरकार सर्वप्रथम सत्तेत आले तेव्हाचे आणि आताचे इंधन दर यांच्यातील तफावत तपासा, असे त्या म्हणाल्या.

नंतर सचिवालय ते निवासस्थान असा प्रवासही ममतांनी स्कुटरवरूनच केला. त्यावेळी काही काळ त्यांनी स्वत: स्कुटर चालवली. बंगालमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची कोंडी करण्यासाठी ममता आणि त्यांच्या पक्षाने (तृणमूल कॉंग्रेस) इंधन दरवाढीचा मुद्दा लावून धरण्याची रणनीती आखली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.