नवी दिल्ली- समलैंगिक विवाहबाबतच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. समाजमान्य नसले तरी देखील हे विवाह यशस्वी होताना दिसत आहेत. काही वर्षापुर्वी दोन मुलींनी एकमेकींबरोबर लग्न केले. त्यानंतर त्या दोघींचे एकत्र फोटो सध्या प्रकाशझोतात आले आहे. फोटोवरुन त्यांच्यातील नात्याबाबत स्पष्टता येत आहे.
अंजली चक्रा आणि संदस(सुफी) मलिक या दोघींनी 2018 मध्ये लग्न केले आहे. अंजली ही भारतीय असून सुफी पाकिस्तानी आहे. या दोघींची ओळख 8 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. त्यावेळी सुफी हीने सोशल मीडियावर ले.सबियन असल्याचा उल्लेख केला होता. नंतर ती पोस्ट पाहून अंजलीने तिला मेसेज केला होता.
सुफी अगोदरच न्यू यॉर्क, अमेरिका येथे राहत होती. नंतर अंजली फिरण्यासाठी न्यू यॉर्क येथे गेल्यानंतर दोघींची तिथे भेट झाली. नंतर काही भेटीतच दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. काही वर्ष रिलेशन मध्ये राहिल्यानंतर दोघींनी 31 जुलै 2018 रोजी लग्न केले.
दरम्यान, त्या्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर नजर टाकली तर त्या दोघीही हा विवाह एम्जॉय करताना दिसत आहेत.