दुबई: नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यानंतर सोमवारी आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी ड्रा राहिली तर दुसरीकडे आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघावर २९६ धावांनी मात केली.
नवीन फलंदाजी क्रमवारीत आॅस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेन, राॅस टेलर आणि बाबर आझम या खेळाडूंना मोठा फायदा झालाय. फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली ९२८ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. त्यानंतर स्टीव स्मिथ(९११), केन विलियमसन(८६४), चेतेश्वर पुजारा(७९१) मार्नस लाबुशेन(७८६) टाॅप ५ मध्ये आहेत.
⬆️ Marnus Labuschagne breaks into 🔝 5
⬆️ Babar Azam breaks into 🔝 10After their consistent performances on recent tours, the two batsmen have made giant strides in the latest @MRFWorldwide ICC Test Rankings for batting 👏
Updated rankings 👉 https://t.co/e3UkSGNkdZ pic.twitter.com/BobjQA5wMk
— ICC (@ICC) December 16, 2019
न्यूझीलंड विरूध्दच्या पहिल्या कसोटीत १ शतक आणि १ अर्धशतक लगावणा-या लाबुशेन यास तीन स्थानचा फायदा झाला आहे आणि तो आयसीसी कसोटी क्रमवारीत ७८६ गुणांसह पाचव्या स्थानी पोहचला आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तानचा बाबर आझमने चार स्थानाची झेप घेत ७२८ गुणांसह ९ वे स्थान पटकावले आहे. टाॅप १० मध्ये भारताचे तीन फलंदाज (कोहली-१, पुजारा-४,रहाणे-६) आहेत.