बंगळुरू – कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमारचे वयाच्या 46व्या वर्षी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली होती. पुनीतला जावून आता 11 दिवस उलटले. तरी त्याच्या चाहत्यांची त्यासाठी असलेली ओढ कणभरही कमी झाली नसल्याचं चित्र आहे.
चाहते अजुनही पुनीतच्या अशा अकाली जाण्याने खचून गेले असून अद्याप सावरले नाहीत. असाच एक 9 नोव्हेंबरचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मृत्यूनंतर पुनीतसाठी रांगेत उभे असलेले चाहते दिसत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो चाहते रांगेत उभे दिसतात. स्मृतीस्थळी पोहोचल्यानंतर चाहते भावूक होऊन पुनीत राजकुमारला आदरांजली वाहतात आणि आपली व्यथा मांडतात. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 9 नोव्हेंबरचा आहे.
A sea of people !
Large number of people gathered at Palace grounds where Actor #PuneethRajukumar ‘s family organised Anna Santharpane today .
Video by @ashishhpendse @NewIndianXpress @santwana99 pic.twitter.com/GDNTUSrfG0
— TNIE Karnataka (@XpressBengaluru) November 9, 2021
29 ऑक्टोबर 2021 रोजी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. समाजिक कार्यामुळे पुनीत सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईल बनला होता.