नवी दिल्ली – 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीकोणातून राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी वृत्तवाहिनीने एक सर्वे केला आहे. त्यानूसार कोणत्या पक्षाला किती जागांवर विजय मिळेल याबाबत अंदाजे माहिती देण्यात आली आहे.
भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम या पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय प्रादेशिक पक्षांनीदेखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. कोणत्या राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार, कोणत्या राज्यात सत्तांतर होणार, आदी प्रश्नांबाबत जनतेच्या मनात काय आहे, यासंदर्भात सर्वेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.
1) उत्तर प्रदेश
कोणाला किती जागा मिळतील आणि (मतांची टक्केवारी)
एकूण जागा : 403
भाजप+ : 213-221 (मतांची टक्केवारी – 41 टक्के)
समाजवादी+ : 152-160 (31 टक्के)
बसपा : 16-20 (15 टक्के)
काँग्रेस : 6-10 (9टक्के)
अन्य : 2-6 (4 टक्के)
2) पंजाब
कोणाला किती जागा मिळतील आणि (मतांची टक्केवारी)
एकूण जागा – 117
आम आदमी पक्ष : 47-53 (36 टक्के)
काँग्रेस : 42-50 (35 टक्के)
अकाली दल : 16-24 (21 टक्के)
भाजप : 0-1 (2 टक्के)
अन्य : 0-1 (6 टक्के)
3) उत्तराखंड
कोणाला किती जागा मिळतील आणि (मतांची टक्केवारी)
एकूण जागा : 70
भाजप : 36-40 (41 टक्के)
काँग्रेस : 30-34 (36 टक्के)
आम आदमी पक्ष : 0-2 (12 टक्के)
अन्य : 0-1 (11 टक्के)
4) गोवा
कोणाला किती जागा मिळतील आणि (मतांची टक्केवारी)
एकूण जागा: 40
भाजप : 19-23 (36 टक्के)
आम आदमी पक्ष : 3-7 (24 टक्के)
काँग्रेस : 2-6 (19 टक्के मते)
अन्य : 8-12 (21 टक्के)
5) मणिपूर
कोणाला किती मते मिळतील आणि (मतांची टक्केवारी)
एकूण जागा- 60
भाजप- 25-29 (39 टक्के मते)
काँग्रेस- 20-24 (33 टक्के)
एनपीएफ- 4-8 (9 टक्के)
अन्य- 3-7 (19 टक्के)