सातारा – गेले काही दिवस सतत सुरु असलेल्या पावसाने सातारा शहरातून कासकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल निवांत पासून हाकेच्या अंतरावर साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. ठिकाठिकाणी दरडी कोसळत असल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्ह्यात गेली आठ दिवस संततधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सर्वात जास्त फटका पाटण व कराड तालुक्यांना बसला असला तरी गुरूवारी सातारा कास रस्त्यावरील हॉटेल निवांतपासून हाकेच्या अंतरावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरडी कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर आले. घटनेदरम्यान सुदैवाने कोणतेही वाहन त्याठिकाणी नसल्याने नुकसान झाले नसले तरी विविध ठिकाणी कोसळणाऱ्या दरडींमुळे हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याने प्रवाशांनी काळजीपूर्वक वाहने चालवून प्रवास करणे गरजेचे आहे.