नवी दिल्ली – संसदेत धुराच्या नळकांड्या फोडलेला ललित झा यांच्याशी संबंधित पश्चिम बंगालच्या एनजीओचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या निधीचीही चौकशी करण्यात येत आहे. ललित झा या एनजीओचे सरचिटणीस आहेत. पोलिसांनी सांगितले की, कोलकाता रहिवासी ललित झा हे व्यवसायाने शिक्षक असून सुरक्षा भंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.
ललित आणि इतर आरोपी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्यापासून प्रभावित होते आणि त्यांना असे कृत्य करायचे होते ज्यामुळे देशाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल. सुरक्षा यंत्रणांना अद्याप असा कोणताही सुगावा मिळालेला नाही, ज्यावरून त्यांचा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध असल्याचे दिसून येईल. त्यांनी सांगितले की हे सहाही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले होते आणि त्यानंतर ते फेसबुकवरील भगतसिंग यांच्या ‘फॅन पेज’शी जोडले गेले होते.
ललित आहे पेशाने शिक्षक…
ललित यानेच पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या सर्व प्रवेशद्वारांची रेकी (टोही) करण्याची सूचना मनोरंजन याला दिली. जुलैमध्ये मनोरंजन दिल्लीला आला आणि व्हिजिटर पासमधून संसदेत गेला होता.
ललितचे शेवटचे लोकेशन राजस्थान-हरियाणा सीमेवरील नीमराना येथे सापडले. पाचही आरोपी १० डिसेंबर रोजी भेटले होते आणि ते गुरुग्राममध्ये विशाल शर्माच्या घरी राहत होते. नीलम, मनोरंजन, अमोल आणि विशाल यांना ताब्यात घेण्यात आले असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी त्यांची चौकशी केली आहे.