लखनऊ – शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसनेत्या प्रियंका गांधीं यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना ज्या पोलीस ठाण्यातील पोलीस गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले त्या गेस्ट हाऊसची खोली प्रियंका गांधी यांनी स्व:ता साफ केली आहे. त्यांचा झाडू मारतानाचा एक व्हिडोओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
प्रियंका गांधींना अटक; पोलीस गेस्ट हाऊसमध्ये कचरा दिसताच हातात घेतला झाडू, व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/5VShdSkQgI
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 4, 2021
आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी निघाल्या त्यावेळी त्यांना पोलीसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना ज्या खोलीत ठेवण्यात आले ती खोली साफ नसल्यामुळे गांधी यांनी हातात झाडू घेऊन ती खोली साफ केली आहे. त्यांचा झाडू मारण्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका गाडीला शेतकऱ्यांनी अडवले होते. शेतकरी त्यांच्याकडे नवीन कृषी कायदे माघारी घेण्याची मागणी करत होते. यावेळी शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी ड्रायव्हरला स्पीड वाढवण्यास सांगून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी गाडीच्या समोर आली. यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला.