मुंबई : कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज सकाळी मंत्रालयात पहिल्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन आपल्या कामकाजाला प्रारंभ केला.
कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज मंत्रालय विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दालन क्र. ११५ व ११७ मध्ये प्रवेश करुन आपल्या कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल व मंत्री महोदयांचे कुटुंबिय उपस्थित होते. pic.twitter.com/S9o4POudNs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 3, 2022
राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील पहिल्या मजल्यावर दालन क्र. 115 व 117 या ठिकाणी कामगार मंत्र्यांचे कार्यालय आहे. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल व मंत्री खाडे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.