पुसेगाव – येथील रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर काटेवाडी ता . खटाव येथे आयोजित केले आहे ,अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर .पी.भोसले यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन दि. १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेज प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित राहणार असूद अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य के .के .घाटगे आहेत.
शिबिराला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, प.पू. सुंदरगिरी महाराज, प्रा. डॉ. नंदकुमार माने हे भेट देणार आहेत. समारोप बुधवार दि. ७ रोजी होणार असून प्रमुख पाहुणे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, अध्यक्ष म्हणून बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांची उपस्थिती आहे. सरपंच सौ. शुभांगी कोरडे, उपसरपंच वैभव कोरडे , कार्यक्रम अधिकारी प्रा. एल. के.पवार, प्रा. एम. बी. सोनार हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.