मुंबई – अभिनेता कुशल बद्रिके आणि भाऊ कदम ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र हे दोघे खऱ्या आयुष्यात देखील तितकेच विनोदी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नुकतेच कुशलने शूट संपल्यानंतर गाडीतून घरी जात असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याच्यासोबत भाऊ कदम देखील होता. या व्हिडिओमध्ये दोघांचाही विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे.
कुशल आणि भाऊ दोघंही काम संपल्यावर एकत्रच घरी जात असताना कारमध्ये भाऊ कदमने कुशलचा हा व्हिडिओ शूट केला आहे. यावेळी कुशलने ‘ये दुनिया बडी जालीम है हर राज छुपाना पडता है, दिल में कितना ही गम हो, महफिल में मुस्कुराना पडता हैं’, असा एक जबरदस्त शेर म्हंटला. यावर ‘काय पाठांतर आहे रे तुझं’ असं भाऊ कदम त्याला म्हणतो आणि कॅमेरा फिरवतो. तेव्हा लक्षात येते की कुशल समोर उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे लिहिलेला शेर वाचत आहे. त्यावर वीर गुर्जर यांचं नाव असतं आणि खाली या दोन ओळी असतात.
हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले “भाऊ कदम आणि मी बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो.
View this post on Instagram
रात्री 3/4 ला पॅकअप करुन निघाल्यानंतर प्रवासात भाऊ आणि माझी मैफिल सुरू होते सोबतीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब कधी पंकज उदास कधी जगजीत सिंगजी कधी हरिहरन कधी लता ताई कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्या सोबत गाडीत असतात…. काल मात्र रात्री 4:30 ला “शेरो-शायरी” ची बैठक बसली “वीर गुर्जर” साहेबां सोबत. त्याची ही छोटीशी झलक …..”