Kushal Badrike : मराठी अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. वैयक्तिक आयुष्याबाबत आणि कामाबाबतची अनेक माहिती तो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकतेच कुशलने पत्नी सुनैना बद्रिकेच्या वाढदिवसानिमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या कुशलची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कुशलने पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं की, ”संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब. आता हिशोब लावला, “तुझ्या-माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी! आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकनेक असलेली policy मोडली होती आपण, आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण ती “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ.
View this post on Instagram
एका दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू ? सांग !अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं , संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार… आता परवाचीच गोष्ट नाही का ? mental stress च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठी वरून हाथ फिरवत बसली होतीस….
ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी ?माझ्या साठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry आणि happy birthday (सुकून ).” पत्नीसाठी लिहीलेल्या कुशलच्या या पोस्टचे सर्वजण कौतुक करत आहे. एका नेटकऱ्याने या पोस्टवर कमेंट करत “नवरा आणि बायको म्हणजे संसार रथाची 2 चाकच जणू” हे ह्या आठवणी आणि त्यांच्या शब्दांतून अप्रतिम व्यक्त केलं आहे कुशलजी…, असे लिहिले आहे. सोबत नेटकऱ्यांनी सुनैना बद्रिके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.