कृती खरबंदा “हाऊसफुल्ल 4′, “पागलपंती’ “चेहरे’ आदी सिनेमाच्या शुटिंगमध्ये सध्या खूप व्यस्त आहे. तिच्याकडे चित्रपटांची कमतरता नाही. पण तिला कधीही ऍक्ट्रेस व्हायचे नव्हते. ऍक्ट्रेस होण्यापेक्षा तिला लग्न करून संसार करायची इच्छा होती. बॉलीवूड असो वा मॉडेलिंग यापेक्षा तिला घर आणि आपला संसार या गोष्टींमध्ये जास्त रस आहे. जेव्हा तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा तिला पहिल्यांदा दक्षिणेतल्या सिनेमांमध्ये रोल मिळाला. बॉलीवूडमध्ये तिला पहिल्यांदा शिरकाव करण्याची संधीच मिळाली नाही.
आता तमिळ अथवा हिंदीमध्येही ती सक्रिय आहे आणि दोन्ही चित्रपट क्षेत्रात तिला भरपूर संधी आहेत. यापूर्वी बॉलीवूडमध्ये “गेस्ट इन लंडन’,”शादी में जरूर आना’, “कारवा’ आणि “यमला पगला दिवाना फिरसे’मध्ये कृती खरबंदा दिसली होती. दक्षिणेतल्या “गुगली’,”सुपर रंगा’, “ब्रुस ली : द फाइटर’ यासारख्या सिनेमात तिने काम केले होते. याशिवाय आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळेही ती फॅशन वर्ल्डमध्ये लोकप्रिय आहे.
कृती खरबंदा आणि बॉलीवूड ऍक्टर पुलकित सम्राट यांचे रिलेशन काही दिवसांपूर्वी चर्चेत होते. पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांचा ब्रेकअप झाल्यानंतर हे नवीन समीकरण जुळले असल्याचे समजते. वरुण शर्माच्या वाढदिवसापासून हे दोघेजण सातत्याने एकत्र दिसले आहेत. पुलकित आणि कृती या दोघांनी चेन्नईमध्ये डेटिंग केल्याचेही आढळून आले आहे.
चेन्नईमध्ये शुटिंगसाठी गेलेल्या पुलकितला सरप्राईज देण्यासाठी कृती तिथे गेली होती. त्यांच्या या सरप्राईज डेटिंगमुळेच त्यांच्यातील स्पेशल रिलेशन बॉलीवूड गॉसिपवाल्यांना समजले आहे. पुलकितने यामी गौतम किंवा कृती दोघींबरोबरचे अफेअर कधीही लपवलेले नाही. पण आपले सगळे लक्ष आपल्या करिअरवरच केंद्रित असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.