मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिंडोरी मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणारे धनराज महाले यांची पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर महालेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाले यांनी सेनेत प्रवेश केला. दरम्यान, महालेंच्या पक्षप्रवेशामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीपुर्वी धनराज महाले यांनी शिवसेनेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरीतून उमेदवारी दिली होती. त्यामुळे खासदार भारती पवार यांनी भाजपची वाट धरली होती. दरम्यान, दिंडोरीतून महाले यांचा भारती पवार यांनी दारुण पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.