आतापर्यंत रोमॅंटिक रोल करणारी क्रिती सेननही आता “सरोगसी’ वर आधारलेल्या सिनेमातील रोल करणार आहे. “मिमी’ असे या सिनेमाचे नाव आहे आणि याचा फर्स्ट लुक अलिकडेच रिलीज झाला. त्यामध्ये दोन हातांमध्ये धरलेले एक लहान मूल दिसते आहे. मराठी सिनेमा “मला आई व्हायचे आहे’ चा “मिमी’हा रिमेक असणार आहे.
विदेशी महिलेने भारतातल्या गरिब महिलेच्या मदतीने जन्माला घातलेल्या सरोगेट बालकावर हा सिनेमा आहे. दिनेश विजनची प्रस्तुती आणि लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शन करणार असलेल्या या सिनेमात पंकज त्रिपाठी एक स्पेशल रोल साकारताना दिसणार आहे. “मिमी’ कधी रिलीज होणार हे समजू शकलेले नाही. क्रितीने या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. “आयुष्य हे अप्रिय चमत्कारांनी भरलेले असते.’ असे तिने या पोस्टर सोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.
क्रिती सेननने आतापर्यंतच्या करिअरमध्ये कधीही आईचा रोल केलेला नाही. आता पहिल्यांदाच ती आईचा रोल करते आहे. “मिमी’मध्ये ती विदेशी महिलेचा रोल साकरते आहे की गरिब भारतीय महिलेचा रोल हे देखील समजू शकलेले नाही. पण ती भारतीय महिलेचा रोल साकारत असेल, अशी शक्यता आहे.