कोयना धरणात अवघ्या बारा तासांत 6.47 टीएमसी पाण्याची आवक

सातारा – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील 12 तासात धरणामध्ये 6.47 टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणाची पाणी पातळी 7 फूट 5 इंच वाढली आहे.

आज दि. 22 जुलै 2021 रोजी सकाळी 5 वाजता धरणाची पाणी पातळी 2124 फूट 3 इंच झाली असून धरणामध्ये 64.98 टीएमसी (62 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमापक केंद्रामधील मागील 12 तासांतील पर्जन्यमानानुसार कोयनानगर 256 मिलिमीटर, नवजा 306 मिलिमीटर आणि महाबळेश्वर 303 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.