‘देश में जब तक कोरोना खत्म नहीं होगा, अन्न ग्रहण नहीं करूंगा’ उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा

उत्तरप्रदेशच्या मंत्री महेश गुप्तांनी घेतली 'भीष्म प्रतिज्ञा'

नवी दिल्ली  – देशातील करोना रूग्णांची संख्या आज पुन्हा चाळीस हजारांच्यावर गेली आहे. काल करोना रूग्णांच्या संख्येत 125 दिवसांची नीचांकी नोंद झाल्यानंतर गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 15 करोना रूग्ण आढळून आले आहेत.

यातच उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी  करोनाला थांबविण्यासाठी   अन्न ग्रहण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली आहे.

ते म्हणाले,’देशामध्ये दहशतवाद संपला असून या यासाठी मी अन्न ग्रहण न करण्याचे ठरवले होते. त्यामुळे आज ‘देशात  दहशतवाद पूर्णपणे संपला आहे.  त्याच प्रमाणे आताही मी पुन्हा एकदा जोपर्यंत देशातून कोरोनाच्या संसर्गाचा खात्मा होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही. ( देश में जब तक कोरोना खत्म नहीं होगा, अन्न ग्रहण नहीं करूंगा)  अशी प्रतिज्ञा करतोय.’ 

महेश गुप्ता पुढे म्हणाले की, ‘देशात  करोनाची दुसरी लाट योगींच्या प्रयत्नांमुळे नियंत्रणात आली.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता उत्तर प्रदेश पूर्णपणे तयार आहे.’ असंही ते म्हणाले आहे.  

दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे सध्या त्यांच्यावर सोशलवर टीका केली जात आहे. तसेच विरोधी नेत्यांकडून त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.