कोंकणा आणि रणवीर शौरीचा घटस्फोटाचा निर्णय

कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी आता अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला असून त्यांचा घटस्फोटाचा अर्ज कोर्टात सादर झाला आहे. 2010 साली एका खाजगी पार्टीमध्ये हे दोघेजण विवाहबद्ध झाले होते. पण त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही.
2015 मध्ये ते वेगळे झाले.

त्यांनी काही काळ वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी हे वैवाहिक नाते कायदेशीरपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळे राहण्याचा निर्णय जाहीर करताना रणवीरने यासाठी स्वतःला जबाबदार मानले होते. पुढच्या 6 महिन्यात त्यांचा घटस्फोट होईल. रणवीर आणि कोंकणाला हरून नावाचा वर्षांचा एक मुलगाही आहे.

मुलाच्या संगोपनामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी दोघांनी मतभेद उघड न करता मित्र म्हणून यापुढेही कायम रहायचे असे सामोपचाराने ठरवले आहे. आतापर्यंतही हरूनचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून दोघांनीही आग्रह धरलेला नव्हता. दोघे मिळूनच त्याची देखभाल करत आले आहेत. रणवीर आणि कोंकणाने “ट्रॅफिक सिग्नल’,”मिक्‍स्ड डबल’ आणि “आजा नचले’सारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.