…यासाठी राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम नियोजनबध्दरित्या हाती घ्या!

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहर हवा प्रदुषणमुक्त होण्यासाठी राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम महापालिका क्षेत्रात अधिक गतीने आणि नियोजनबध्द पध्दतीने हाती घ्यावा अशी सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.

मा.राष्ट्रीय हरीत लवाद न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम राबविण्यासाठी करावयाच्या उपायोजनांसाठी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे महापालिकेच्या सर्व आरोग्य निरिक्षकांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांच्यासह सर्व आरोग्य निरिक्षकांनी या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला.

कोल्हापूरची हवा, शुध्द हवा यासाठी या पुढील काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने हवा प्रदूषण रोखण्यासाठी आरोग्य स्वच्छतेचा प्रभावी कार्यक्रम हाती घ्यावा अशी सुचना करुन आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले शुध्द हवा कार्यक्रमांर्तगत रस्त्यावरील दैंनदिन सफाई स्वच्छता यावर भर देऊन धूळ होणार नाही तसेच उघडयावर कचरा आणि पालापाचोळा जाळला जाणार याची खबरदारी घ्यावी. परिवहन विभागाच्यावतीने वाहनांच्या धूर तपासणीचा कार्यक्रम हाती घ्यावा. नव्याने होणाऱ्या बांधकामामुळे वाहतुकी दरम्यान धूळ उडणार नाही यासाठी प्रतिबंधन योजनांवर भर द्यावा. तसेच सर्व आरोग्य निरिक्षकांनी आपआपल्या वार्डामध्ये कचरा विलगीकरणाच्या दृष्टीने नियोजन करावे.

शुध्द हवा कार्यक्रम महापालिका क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी महापालिकेबरोबरच शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, स्वंयसेवी संस्थांनी या कार्यक्रमात सक्रिय योगदान देऊन कोल्हापूरची हवा शुध्द हवा निर्माण करण्याचा प्रयत्नाला साथ द्यावी असे आवाहनही आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी केले. ते म्हणाले महापालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी येत्या आठवडयाभरात विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची सुचनाही त्यांनी केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.