बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ हिने नुकताच आपल्या इंस्ट्राग्राम आकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा पासपोर्ट कव्हर ठळकपणे झळकत आहे. ‘गोयार्ड क्रिएशन’चे हे कव्हर असून हा एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. निळ्या रंगाची ही केस असून, तिची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. दीपिकाच्या या पासपोर्ट कव्हरची किंमत 755 डॉलर म्हणजेच 52,936 रुपये इतकी आहे.
सध्या दीपिका पदुकोण ‘कान्स’ साठी रवाना झाली असून, ती ‘कान्स’मध्ये काय कपडे परिधान करणार आहे याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष वेधलेलं आहे. ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे हे ७२ वे वर्ष आहे. हा महोत्सव १४ मे रोजी सुरू झाला असून २५ मे रोजी संपणार आहे. देशभरातील प्रसिद्ध कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
https://www.instagram.com/p/Bxg5RupAvmN/?utm_source=ig_web_copy_link