मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल होणं आजकाल काही नवीन नाही परंतु क्रिकेट खेळतीय म्हणून ट्रोल होणारी अभिनेत्री पहिल्यांदाच पाहिली. हो हे खरं आहे एका अभिनेत्रींचे क्रिकेट खेळतानाचे फोटो समोर आले आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. ही अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर.
जान्हवी कपूरने एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती क्रिकेट खेळताना दिसत आहे. यावरून आता आगामी चित्रपटात जान्हवी क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, “इट्स बिन अ मिनिट” यासह, तिने बॅट आणि बॉलचे इमोजी शेअर केले आणि हॅशटॅगमध्ये मिस्टर अँड मिसेस माही असे चित्रपटाचे नाव देखील लिहिले आहे. यावरूनच आता जान्हवीला काहींनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
या पोस्टवर जान्हवीचा जवळचा मित्र मानला जाणारा ओरहान अवतारमणीने आश्चर्यचकित करणारा इमोजी कमेंट केली आहे. विशेष म्हणजे जान्हवीचा क्रिकेटर अवतार पाहून चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, सॉरी विराट,जान्हवी माझी आवडती क्रिकेटर आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, के एल राहुलचा रिप्लेसमेंट सापडला.
जान्हवी कपूर नुकतीच ‘मिली’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. आता अभिनेत्रीने पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये जान्हवीसोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.