मुंबई – आपल्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. जानव्ही नेहमी वेगवेगळ्या स्टायलिश लूकमध्ये प्रत्येक ठिकाणी जाते. जिम पासून ते प्रवासापर्यंत जान्हवीचा कॉश्यूम सेन्स अनेकांना आवडतो. नुकतीच जान्हवी कपूर एका विमानतळावर स्पॉट झाली ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर अतिशय सुंदर आउटफिटमध्ये दिसत आहे. निळ्या फिट डेनिमसह पांढर्या फुल स्लीव्ह शर्टमध्ये असलेला तिचा साधा लूक चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. परंतु तिने आपल्या शर्टसोबत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला ज्याने सोशल मीडिया यूजर्सचं लक्ष वेधून घेतलं आणि ती ट्रोल होऊ लागली.
View this post on Instagram
जान्हवी कपूरच्या या एअरपोर्ट लूकची खूप चर्चा होत आहे. प्रवासाच्या काळातही अनेक अभिनेत्री फॅशनची पूर्ण काळजी घेतात, तर जान्हवीने तिचा लूक अगदी साधा ठेवला. पण तरीही ती ट्रोलरच्या निशाण्यावर आली. एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – तुम्ही बटण बंद करायला विसरलात का? तर दुसर्याने लिहिलं की – ती मिस्टर अँड मिसेस माहीच्या शूटसाठी जयपूरला जात आहे. जान्हवीला आपल्या स्टाइलवरून ट्रॉल करण्याची ही पहिलीच वेळ नाही तर या आधी देखील चाहत्यांनी तिला वाईट कमेंट केल्या आहेत.