मुंबई – योगगुरु बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वी महिलांबाबत एक आक्षेपार्ह विधान केलं होत. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड सुरु झाली होती. आता बाबा रामदेव यांनी आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
“बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती ,याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे” अशा आशयाचे ट्विट रुपाली चाकणकर यांनी करत बाबा रामदेव यांचे पत्र पोस्ट केले आहे.
बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस१/२ pic.twitter.com/umI27luSK7
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 28, 2022
काय म्हणाले होते बाबा रामदेव नेमकं
ठाण्यातील योग्य शिबिरादरम्यान योग गुरु बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानानंतर मोठा वाद सुरु झाला होता. ते म्हणाले होते,”महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने पाहता काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात,” यावेळी मंचावर अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.