अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांचं लग्न कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली.
मीडिया रिपोर्टनुसार या दोघांचं लग्न 23 जानेवारी रोजी होणार आहे. (KL Rahul To Get Married To Athiya Shetty On January 23) मात्र, अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही.
भारताचा दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे 23 जानेवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुलची सुट्टी मंजूर केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही. शनिवारी (13 जानेवारी) बीसीसीआयने सांगितले की, राहुलला वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे. यावरून,केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार असं स्पष्ट होतं आहे.
केएल राहुलच्या लग्नात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबियांसोबत उपस्थित राहू शकतात.
लग्नाचा कार्यक्रम तीन दिवसांचा असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पहिल्या दोन दिवसात हळद, मेंहदी आणि संगीताचे विधी होतील. आणि तिसऱ्या दिवशी दोघेही सात फेऱ्या घेतील. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील बंगल्यावर हे लग्न होऊ शकते.
लग्नानंतर लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी वांद्रे येथे राहणार आहेत. अथिया-राहुलचे घर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घराजवळ असेल.
धोनी आणि कोहली व्यतिरिक्त, हार्दिक पांड्या, अमिताभ बच्चन, सलमान खान, जॅकी श्रॉफ आणि अक्षय कुमार यांसारखे दिग्गज व्यक्ती त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. राहुल आणि अथिया अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सुनील शेट्टी याने देखील या दोघांच्या नात्याबदल उघडपणे सांगितलेले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर एप्रिलमध्ये त्यांचे ग्रँड रिसेप्शन होणार आहे. हे एखाद्या खाजगी कार्यक्रमासारखे असेल, ज्यामध्ये क्रिकेट जगत, बॉलीवूड आणि काही व्यावसायिक मित्र उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय सुनील शेट्टी आणि केएल राहुलचे कुटुंबीय रिसेप्शनला उपस्थित राहणार आहेत.
आथिया आणि केएल राहुल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर करतात. नुकतेच नववर्ष साजरे करण्यासाठी दोघेही दुबईत पोहोचले होते. याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे फोटोही चाहत्यांना आवडतात.