Live Cricket Score, KKR vs LSG Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्सचा सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने या सामन्यासाठी रिंकू सिंगला बाहेर ठेवले असून त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
शमर जोसेफ लखनौ संघात पदार्पण करणार आहे. या सामन्यासाठी लखनौने काही बदल केले आहेत. या सामन्यासाठी देवदत्त पडिक्कल आणि नवीन उल हक यांची निवड करण्यात आलेली नाही, तर दीपक हुडा आणि मोहसीन खानचे पुनरागमन झाले आहे.
KKR vs LSG Live: दोन्ही संघांची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग.
लखनौ सुपरजायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
इम्पॅक्ट सब : अर्शद खान, प्रेरक मांकड, एम सिद्धार्थ, अमित मिश्रा, के. गौतम
या हंगामात दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस अय्यरच्या संघाने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. या कालावधीत केकेआरने तीन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. संघाचा निव्वळ धावगतीही बऱ्यापैकी आहे. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने खेळले आहेत, ज्यात तीन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केएल राहुलचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
कोलकाता आणि लखनौ यांच्यात आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. यातील तिन्ही सामने लखनौने जिंकले आहेत. मात्र, गंभीर लखनौचा मार्गदर्शक असताना एलएसजीने हे तीनही सामने जिंकले होते. आता गंभीर कोलकात्यासोबत असल्याने केकेआर संघ हा विक्रम सुधारण्याचा प्रयत्न करेल. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या दोघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. 20 मे 2023 रोजी झालेल्या या सामन्यात लखनौने कोलकात्याचा एका धावेने पराभव केला होता.