Live Cricket Score, KKR vs LSG Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्सचा सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
तत्पूर्वी, लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update from Eden Gardens, Kolkata 🚨@KKRiders won the toss & elected to bowl against @LucknowIPL.
Follow the Match ▶️ https://t.co/ckcdJJTe3n #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/DEVd8JpAFC
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
या हंगामात दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस अय्यरच्या संघाने या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. या कालावधीत केकेआरने तीन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. संघाचा निव्वळ धावगतीही बऱ्यापैकी आहे. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
तर लखनौ सुपर जायंट्सने पाच सामने खेळले आहेत, ज्यात तीन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केएल राहुलचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
कोलकाता आणि लखनौ यांच्यात आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. यातील तिन्ही सामने लखनौने जिंकले आहेत. मात्र, गंभीर लखनौचा मार्गदर्शक असताना एलएसजीने हे तीनही सामने जिंकले होते. आता गंभीर कोलकात्यासोबत असल्याने केकेआर संघ हा विक्रम सुधारण्याचा प्रयत्न करेल. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या दोघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला आहे. 20 मे 2023 रोजी झालेल्या या सामन्यात लखनौने कोलकात्याचा एका धावेने पराभव केला होता.