निर्धार पक्का ! किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापूरला रवाना

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरात येऊ नये अशी नोटीस तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली आहे.

सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडण्यासाठी सीएसएमटीला आले असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये तुमच्या जीवाला धोका आहे, असं म्हणत पोलिसांनी सोमय्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते.

अखेर ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसले. कोल्हापूरकडे रवाना होत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ठाकरे सरकारची दडपशाही सुरू असून माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.