17 पैकी 12 जगांवर निर्विवाद वर्चस्व : विरोधी पॅनलला केवळ चार जागा
राजगुरूनगर – राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भीमाशंकर सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवत 12 जागा मिळवल्या तर प्रतिस्पर्धी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले.
राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती गटातून विजय डोळस हे बिनविरोध निवडून आले आहेत. बॅंकेच्या निवडणुकीत 65.63 टक्के मतदान झाले होते. चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे, सचिन सरमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.
यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सहायक निबंधक विभागाचे अधिकारी संजय कऱ्हाडकर, जे. बी. मुलाणी आदी अधिकारी उपस्थित होते.
गटनिहाय निवडून आलेले उमेदवार (मते)
सर्वसाधारण गट (12 जागा) : किरण चंद्रकांत आहेर (10822), समीर प्रतापराव आहेर (7192), दिनेश रमेश ओसवाल (7870), विनायक शूरसेन घुमटकर (7842), राहुल पोपटराव तांबे (8397), अरुण राघु थिगळे (8807), गणेश एकनाथ थिगळे (9959), सागर काळुराम पाटोळे (8659), दत्तात्रय रामचंद्र भेगडे (7173), किरण वसंतराव मांजरे (8646), राजेंद्र दशरथ वाळुंज (7884), राजेंद्र मारुती सांडभोर (7242). या गटात 700 मते बाद झाली. सर्वसाधारण महिला राखीव गट (2 जागा) : विजया रामदास शिंदे (9810), अश्विनी राजेंद्र पाचारणे (9064). या गटातही 700 मते बाद झाली.
भटक्या जाती जमाती/विशेष मागास प्रवर्ग (1 जागा) : रामदास नारायण धनवटे (9287) या गटात 1397 मते बाद झाली.
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी 1 जागा) : अविनाश तुकाराम कहाणे (6511) या गटात 1898 मते बाद झाली.
अनुसूचित जाती जमाती : विजय डोळस (बिनविरोध)