मुंबई – कबीर सिंग या चित्रपटामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री ‘कियारा अडवाणी’ने फॅन्सच्या मनात आपले एक वेगळे घर निर्माण केले आहे. कबीर सिंग सिनेमात कियाराने एका साध्याभोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते.
दरम्यान, सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारी कियारा अडवाणी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या अफवांनंतर पहिल्यांदाच मीडिया समोर आली आहे. मात्र, यावेळी ती एकटी नसून तिच्या सोबत अभिनेता ‘कार्तिक आयर्न’ होता. सध्या सोशल मीडियावर या दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांना एकत्र पाहणे चाहत्यांना नेहमीच आवडते. मात्र, आता ते शक्य नसल्याचे दिसत आहे. नुकतीच कियारा अडवाणी तिच्या आगामी ‘भूल भुलैया 2’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली होती.
या प्रसंगी, कियाराने निऑन गुलाबी ब्लेझर ड्रेस परिधान केले होते. यावर तिने मॅचिंग गुलाबी शूज केला होता. तिने सोन्याच्या कानातले व बन हेअर स्टाईल केली होती. या लूकमध्ये ती प्रचंड ग्लॅमर्स दिसत होती.
दरम्यान, ‘भूल भुलैया 2’ सिनेमात कियारा अडवाणी सोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे. येत्या 20 मे रोजी हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. तसेच, या चित्रपटाशिवाय कियारा अडवाणी ‘गोविंदा नाम मेरा’ आणि ‘जुग जुग जिओ’ या सारख्या सिनेमांत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.