अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथे जय भवानी नवरात्रोत्सव मंडळ व श्रीमंत दगडूशेठ प्रतिष्ठान खंडाळी यांच्या वतीने आज बुधवारी (दि. २७) रात्री ७ वाजता भव्य दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे खंडाळी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अमोल मेथा यांनी केले आहे.
दरम्यान हजारो दिव्यांनी जय भवानी मंदिर परिसर उजळून निघणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहभागी व्हावे, असेही मेथा यांनी सांगितले.