अमोल शिवले मित्र परिवाराचा उपक्रम
वाघोली : भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरपुरम(जाणीव संस्था) या ठिकाणी नागालॅंड मिझोरम येथील गरीब गरजु विद्यार्थ्यानां दिवाळीचे फराळाचे वाटप करुन त्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी जाऊन महाराजांची पुजा व अभिषेक करण्यात देखील करण्यात आला. तसेच वेदप्रकाश गोयल मतिमंद विद्यालयात दिवाळी फराळाचे वाटप करुन संस्थेला आर्थिक स्वरुपाची मदत करण्यात आली.
या वेळी फुलगावचे माजी सरपंच कांताराम वागस्कर, लोणीकंदचे माजी उपसरपंच रविंद्र कंद,विक्रम गायकवाड, स्वप्निल उंदरे, शिवाजी दरेकर, रविंद्र वाळके,पै. किरण साकोरे, तुळापुरचे माजी सरपंच गणेश पुजारी, फुलगावचे माजी उपसरपंच राहुल वागस्कर, माजी उपसरपंच राहुल राऊत, संतोष शिवले, हवेली भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद,ग्रा.पं.सदस्य संजय चव्हाण,
पी.डी.सी.बॅंकेचे कृषी अधिकारी योगेश शिवले, जयेश कंद, अमित दरेकर, नवनाथ हरगुडे, सुरज दरेकर, युवा नेते योगेश शिवले,तंटामुक्ती उपाध्यक्ष अनिल शिवले, संतोष शिवले, माऊली उंदरे, सोपान शिवले, राहुलदादा शिवले अन्य मान्यवर उपस्थित होते.