कापूरहोळ -भोर तालुक्यातील मौजे केंजळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व माजी सभापती सुनिता बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. मागील वीस वर्षे केंजळ सोसायटीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंद्रकांत बाठे यांचे वर्चस्व आहे. तेरा सदस्य असलेल्या सोसायटीमध्ये बारा जागांसाठी सदस्य निवडण्यात आले.
यामध्ये राष्ट्रवादीचे आठ सदस्य तर कॉंग्रेसचे चार सदस्य विनविरोध निवडण्यात आले. एका जागेवर उमेदवार न मिळाल्याने ती रिक्त ठेवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक बी. एम. तावरे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यांना सोसायटीचे सचिव पुरुषोत्तम बाठे यांनी सहकार्य केले.
चेअरमन पदासाठी सर्जेराव बाठे यांचा तर व्हाईस चेअरमनपदी सूर्यकांत यादव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळ सर्जेराव सीताराम बाठे, दिनकर काळुराम दातीर, संपत बाबुराव वाटे, अमोल तानाजी बाठे,
जनार्दन सोनबा काळे, बाळासाहेब नारायण दातीर, वासुदेव तुकाराम बाठे, बाबासाहेब ज्ञानोबा भालघरे, सूर्यकांत ज्ञानदेव यादव, अरविंद रघुनाथ जाधव, शोभा सुभाष शेटे, नंदा मोरे. यावेळी सरपंच कविता बाठे, ग्रामपंचायत सदस्य किरण येवले, उत्तम शेटे, राकेश बाठे, पांडुरंग बाठे, उत्तम बाठे, शांताराम बाठे, रामचंद्र बाठे उपस्थित होते.