नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Kejriwal ) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील शाळा सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. या कार्यासाठीचे कौशल्य आमच्या सरकारकडे आहे आणि हे कौशल्य देशभर वापरता येऊ शकते, ते देण्याची तयारीही केजरीवालांनी दर्शवली आहे.
मोदींनी गुजरातमधील गांधी नगर येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेथे गुजरात सरकारच्या एका शैक्षणिक प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी त्यांना हे आवाहन केले आहे. केजरीवाल ( Kejriwal ) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान महोदय, आम्ही दिल्लीत शिक्षणाच्या क्षेत्रात अप्रतिम काम केले आहे.
मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंचं, दिल्ली उच्च न्यायालयाने समता पार्टीची याचिका फेटाळली
पाच वर्षांत दिल्लीतील सर्व सरकारी शाळांमध्ये उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. पाच वर्षांत देशभरातील शाळांमध्ये अशा प्रकारची सुधारणा होऊ शकते, आम्हाला या क्षेत्रातील अनुभव आहे. कृपया आमचा अनुभव यासाठी पूर्णपणे वापरा. चला देशासाठी मिळून काम करूया असे आवाहनही केजरीवालांनी केले आहे.
“मला खूप आनंद होत आहे की आज देशातील सर्व पक्ष आणि नेत्यांना शिक्षण आणि शाळांबद्दल बोलायचे आहे. ही आमची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मला आशा आहे की केवळ निवडणुकीच्या वेळी शैक्षणिक सुधारणांची चर्चा केली जाणार नाही. सर्व सरकारे मिळून आपल्या शाळांना फक्त पाच वर्षात उत्कृष्ट बनवू शकतात, असेही केजरीवालांनी ( Kejriwal ) आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.