विशेष खर्च निरीक्षक मुरलीकुमार यांच्या सूचना
पुणे – मोठ्या रकमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा, अशा सूचना विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी निवडणूक विभागाला दिल्या. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध विभाग प्रमुख आणि पथक प्रमुख यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.
या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवडणूक निरीक्षक चंद्रशेखर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, निवडणूक खर्च व्यवस्थापन विभागाचे समन्वय अधिकारी अजित रेळेकर, सी-व्हिजीलचे समन्वय अधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, माहिती उपसंचालक मोहन राठोड आदी उपस्थित होते.
सर्व पथकांनी अचूक आणि काटेकोर कामकाज करावे, तसेच दैनंदिन माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावी, अशा सूचना मुरलीकुमार यांनी दिल्या