मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते केदार शिंदे हे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाला 25 वर्षे झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांनी पत्नीबरोबर पारंपरिक पद्धतीने विवाह केला आहे.
या विवाहाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केदार शिंदे यांच्या घरातच अगदी मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
रविवारी 9 मे रोजी केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला यांना पुन्हा एकदा विवाह केला. त्यांच्या या विवाहाला केदार आणि बेला यांचे अगदी जवळचे मित्र अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, शर्मन जोशी आणि आदेश तसेच सुचित्रा बांदेकर यांची खास उपस्थिती होती.
याशिवाय केदारचे अनेक मित्र आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केदार आणि बेला यांच्यावर अक्षता टाकल्या. वसुंधरा साबळे यांनी फेसबुकवर या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.