पुणे – “केशरी कार्डधारकांनाही आरोग्य योजनेचा लाभ मिळावा’

पुणे – महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत 1 लाखाच्या आतील उत्पन्न असलेल्या नागरिकांना मोफत उपचार केले जातात. यात महापालिकेने केशरी रेशन कार्डधारकांनाही हे उपचार द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाने महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. 1 लाखाच्या आत उत्पन्न असल्यास केशरी रेशनकार्ड दिले जाते. ही बाब लक्षात घेऊन याबाबत अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.

शहरी गरीब योजने अंतर्गत 1 लाखाच्या आत उत्पन्न असल्यास शहरातील पालिकेच्या पॅनेलवरील खासगी रुग्णालयात शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार केले जातात. काही आजारांसाठी या योजनेत 2 लाखांचा खर्च दिला जातो. या योजनेचे सभासद होण्यासाठी पिवळे रेशनकार्ड अथवा 1 लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक आहे.

त्याच वेळी शासनाकडून 1 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांनाही केशरी रेशनकार्ड देण्यात आलेले आहे. त्यामुळे हे रेशनकार्ड घेऊन तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला आणावा लागतो. मात्र, यासाठी नागरिकांना मानसिक तसेच आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने या योजनेसाठी केशरी रेशनकार्ड गृहीत धरावे, अशी मागणी पक्षाचे राज्याचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे आणि शहर सचिव गणेश ढमाले यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.