पुणे – जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी के. डी. वडणे यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्यांच्या स्वागत समारंभ नुकताच कन्झ्युमर अॅडव्होकेट्स असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. आयोगाचे सदस्य क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख आणि असोसिएशनचे अध्यक्ष अॅड संजय गायकवाड, उपाध्यक्ष अॅड. ज्ञानराज संत, सचिव अॅड. मिलिंद महाजन, ज्येष्ठ वकील ऋषिकेश गानू यावेळी उपस्थित होते. अॅड. गायकवाड यांच्या हस्ते वडणे यांचा सत्कार करण्यात आला.
सदस्य कुलकर्णी म्हणाल्या, अध्यक्षपदी न्यायिक सदस्य यांची नेमणूक झाल्यामुळे तक्रारींचा निपटारा लवकर होईल. वडणे म्हणाले, “यापूर्वी मी पुण्यामध्ये दोनदा जिल्हा न्यायाधीश या पदावरती काम केलेले आहे. त्यामुळे पुण्यात काम करण्याचा अनुभव या ठिकाणी उपयोगी येईल. लवकरात लवकर तक्रारींचा निपटारा करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी अॅड. गायकवाड आणि अॅड. गानू यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अॅड. संत यांनी केले. अॅड. महाजन यांनी आभार मानले.