कात्रज तलाव ओव्हरफ्लो; पर्यटकांची गर्दी

कात्रज – जगप्रसिद्ध नायगारा धबधबा व त्याठिकाणी केलेली विद्युत रोषणाईच्या धर्तीवर कात्रज येथील ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलाव येथे नगरसेवक वसंत मोरे यांनी 40 एलईडी लाईटच्या साहाय्याने आकर्षक नेत्रदीपक देखाव्यात रूपांतर केले आहे. हा देखावा कात्रज स्मशानभूमीतून पाहता येत आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

नगरसेवक वसंत मोरे यांनी कल्पकतेतून 2016 साली हा प्रयोग केला. त्याला प्रतिसाद मिळाल्याने यंदा ही 40 एलईडी दिवे बसवून विद्युत रोषणाई करण्यात आली. परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत असून मोबाइलमध्ये सेल्फी घेऊन आनंद घेत आहेत. हा देखावा बुधवार ते शनिवार सुरू राहणार आहे. ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षा रक्षक यांच्या सूचनांचे पालन करत आनंद घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी भेट देण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.