मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीला जाऊन भेट घेतली. भेटीदरम्यान काय चर्चा झाली याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून माहिती देखील दिली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे वडील, पत्नी, मुलगा (श्रीकांत शिंदे), सून आणि नातू असा संपूर्ण परिवार उपस्थित होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेच्या या भेटीनंतर संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला असल्याचं दिसून आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिट्वीट करत ”महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.” असं मोदींनी म्हटलं.
कष्ट टाळू मुख्यमंत्री
ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री….महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!#Shivsena #EknathShinde #NarendraModi #DrShrikantEknathShinde@narendramodi @mieknathshinde pic.twitter.com/p05JKZsKYT
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 23, 2023
तर, याच ट्विटला खासदार श्रीकांत शिंदेंनी रिट्वीट करत ”कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री.. महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!” असं म्हटलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.