नवी दिल्ली – डोमन मांझी यांचा मुलगा चार वर्षीय शुभम कुमार रविवारी सकाळी ९ वाजता खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलाने या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली, त्यानंतरच घरच्यांना याची माहिती मिळाली. माहिती मिळताच मदतकार्यासाठी संबंधित यंत्रणांना पाचारण करण्यात आले असता एनडीआरफची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील थाना परिसरातील कुल गाव येथे ही दुर्घटना घडली.
तब्बल सात तासानंतर एनडीआरफच्या टीमला शुभमला वाचवण्यात यश आले. शुभम तीडशे फूट खाली बोरवेलमध्ये असताना त्याच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला होता. मुलाला बाहेर काढल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये एनडीआरएफचे जवान एका मुलाच्या मांडीवर कापड गुंडाळून रुग्णवाहिकेत बसल्याचे दिसून येते. यानंतर रुग्णवाहिका रुग्णालयात जाण्यासाठी निघते. एनडीआरएफ अधिकारी रणजीत कुमार यांचेही वक्तव्य या संदर्भात आले आहे.
#WATCH | Bihar: The child who fell into a borewell in Kul village in Nalanda has been rescued. More details are awaited. https://t.co/G6FW8RDIJJ pic.twitter.com/KQouMHkffD
— ANI (@ANI) July 23, 2023
मूल ठीक असून त्याला वाचवण्यात आले आहे. त्याला वाचवण्यासाठी आम्हाला जवळपास 5 तास लागले. त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.असं रणजित कुमार या ऑपरेशन नंतर म्हणाले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील मुलाचे फुटेजही समोर आले असून, त्यात तो सुरक्षित दिसत होता. मुलाला दूध आणि पाणी पाठवले, पण तो घेऊ शकला नाही. त्याच्या रडण्याचा आवाजही ऐकू आला.प्रशासनाकडून बोअरवेलखाली सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला होता. तीन-चार पोकलेनच्या साहाय्याने बाजूला खड्डा खोदून त्याला वाचवण्यात आले. मुलाच्या कुटुंबीय खूप चिंतेत होते.मात्र मुलाला बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.