नेवासा (प्रतिनिधी) – कुकाणा -देडगांव रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वारास दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली असून, याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, कुकाणा-देडगांव रस्त्यावरुन स्विप्ट कार (क्रमांक एम.एच १४ एफ.जी.०२०९) ही कुकाण्याकडे भरधाव वेगात येत होती.
तर कुकाण्याहून देडगांवच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक एम.एच.१६ डि.एफ.२४८६) यांची समोरासमोर धडक होवून दुचाकीवरील सोमनाथ नवनाथ गाले (वय २०)रा.मिरी (ता.पाथर्डी) व कष्णा काकासाहेब खाटिक (वय २२)रा.खाटकवाडी ता.नेवासा हे दोन युवक या अपघातात गंभीर जखमी झाले होते.
मात्र, त्यानंतर तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर औषधोपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यु झाला असून अपघातानंतर स्विप्ट कार चालक फरार झाला असून, कुकाणा दुरक्षेञाचे पोलीस नाईक तुकाराम खेडकर या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.