श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक काश्मिरी पंडित जखमी झाला. ती घटना शोपियॉं जिल्ह्यातील एका गावात घडली.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात बाल कृष्णन नावाचा काश्मिरी पंडित दुकानदार जखमी झाला. गोळीबारात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी श्रीनगरमधील लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. काश्मिरी पंडितावरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्करी अधिकारी संबंधित गावात दाखल झाले.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एकाच दिवसात केलेल्या हल्ल्याची ती तिसरी घटना ठरली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. अशात काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घडामोड सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे.