मुंबई – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दरम्यान कार्तिक आणि कियाराचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कार्तिक कियाराला उप्स मोमेंटची शिकार होण्यापासून वाचवताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.
‘भूल भुलैया 2’च्या प्रमोशनदरम्यान कियारा अडवाणीचा शॉर्ट ड्रेस लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याच शॉर्ट ड्रेसने यावेळी कियाराला अडचणीत आणले आहे. अभिनेत्री शॉर्ट ड्रेसमुळे उप्स मोमेंटची शिकार होणार तेवढ्यात मात्र कार्तिक आर्यन तिच्या मदतीला आला व अभिनेत्रीचा यापासून बचाव केला. दरम्यान या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘भूल भुलैया 2’ च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटचा आहे. यादरम्यान कियाराने लाल रंगाचा सुंदर शॉर्ट ड्रेस परिधान केला होता .त्यावर ऑरेंज कलरचे जॅकेट घातले होते तर कार्तिक आर्यन ब्राऊन कलरचे जॅकेट आणि पॅन्टमध्ये होता. दरम्यान कार्तिकने कियाराच्या केलेल्या या बचावामुळे त्याचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होताना दिसून येत आहे. दोघांच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.